मानकी येथे बैल पोळा उत्सव उत्साहात साजरा, सर्जा-राजाची सजवून वाजतगाजत मिरवणूक; मान्यवरांच्या हस्ते बैलांची विधिवत पूजा

वणी : 

तालुक्यातील मौजे मानकी येथे पारंपरिक बैल पोळा उत्सव उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला आकर्षक पद्धतीने सजवून वाजतगाजत पोळा उत्सवस्थळी आणले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारी सायंकाळी गावातील नाल्याच्या काठावरील खुल्या जागेत बैल पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ५.३० वाजता सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत बैलांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पोळा उत्सवाची सांगता करण्यात आली.
यावेळी शेतकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. रंगीबेरंगी सजावटीने नटलेल्या सर्जा-राजामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post