वणी :
राज्याचे माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या वणी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान पुरके यांचे आत्मीयतेने स्वागत करण्यात आले तसेच त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
भेटीदरम्यान संघटनात्मक बळकटी, सामाजिक प्रश्न आणि जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांना गती देण्याबाबतही विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.
यावेळी संजय खाडे यांनी सांगितले की, "मा. वसंतराव पुरके साहेब यांचा प्रदीर्घ राजकीय व सामाजिक अनुभव, त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि दूरदृष्टी आम्हाला नेहमीच प्रेरणादायी ठरते. त्यांच्या मार्गदर्शनातून संघटनात्मक कार्याला नवी दिशा व ऊर्जा मिळते."