वणी :
येथील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शाखांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण व घोषवाक्य लेखन हा उपक्रम आज, शनिवार दि. ४ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाला शाळेचे संचालक तथा माजी पंचायत समिती सभापती *संजय पिंपळशेंडे, मुख्याध्यापिका सौ. अश्विनी सचिन ढोले तसेच उपमुख्याध्यापिका सौ. पूजा जोबनपुत्रा* उपस्थित होत्या.
यावेळी शाळेचे संचालक संजय पिंपळशेंडे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणातील अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगितले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
*घोषवाक्य लेखन* उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाबाबत प्रभावी संदेश दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली तसेच समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली.
शाळेचे संचालक संजय पिंपळशेंडे, मुख्याध्यापिका अश्विनी ढोले आणि उपमुख्याध्यापिका पूजा जोबनपुत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.