वणी :
येथील संत नामदेव महाराज चौक, जत्रा रोड येथे शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी श्री संत नामदेव महाराज यांची ६७६ वी पुण्यतिथी भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शिंपी समाज संस्थेच्या वतीने संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष अनिल अक्केवार यांनी संत नामदेव महाराजांच्या सामाजिक, आध्यात्मिक व भक्तीपर कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संतोष कर्णेवार, महिला सचिव तथा नगरसेविका पूजा रामगीरवार, दीपक दीकुंडवार, मोरेश्वर उज्वलकर, कुंतलेश्वर तुरविले सर, उमेश वराडे, विजय गटलेवार, नरेश रामगीरवार, विनोद गटलेवार, कैलाश कर्णेवार, बहादे, स्वप्निल कर्णेवार, अनिकेत अक्केवार, प्रज्योत रामगीरवार, प्रियंका कर्णेवार, वैशाली नमूलवार, वेदिका अक्केवार तसेच शिंपी समाजातील अनेक समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.