वणी :
ब्राह्मण सभा वणीच्या वतीने दिनांक १६ मे २०२६ रोजी शनिवारी श्री जैताई देवस्थान येथील सभागृहात सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान माननीय सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. एकनाथराव जोशी यांनी भूषविले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभेचे उपाध्यक्ष माननीय श्री. चंद्रशेखरजी खोंड, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. दिलीप अलोणे तसेच सेवानिवृत्त श्री. किशोरराव साठे उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी ब्राह्मण सभेचे माजी अध्यक्ष श्री. राजाभाऊ पाथ्रडकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेचे उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी खोंड यांनी सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची घोषणा केली.
नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्री. अरुण कावडकर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून श्री. चंद्रशेखरजी खोंड, सचिव श्री. श्रीकांत उपाध्ये, सहसचिव श्री. प्रसाद चिडले, कोषाध्यक्ष श्री. मिलिंद आमलेकर, संघटक श्री. मनोज सरमोकदम यांची निवड करण्यात आली.
तसेच कार्यकारी सदस्य म्हणून श्री. श्रीवल्लभ सरमोकदम, आनंद शोभणे, संकेत भुलगांवकर, निखिल साठे, नितीन सराफ, जयंता लिडबिडे, अक्षय अणे यांची निवड करण्यात आली. महिला सदस्य म्हणून सौ. अनुराधा वैद्य व सौ. श्रुती उपाध्ये यांचा समावेश करण्यात आला. प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री. परितोष पानट, विधी सल्लागार म्हणून अॅड. आनंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय ज्येष्ठ सल्लागार म्हणून प्रा. डॉ. दिलीप अलोणे, प्रा. डॉ. स्वानंदजी पुंड तसेच प्रा. डॉ. अभिजीत अणे यांची निवड करण्यात आली.