वणी :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वणी विधानसभा क्षेत्र (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने सोमवार, १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता येथील वसंत जिनिंग हॉल येथे अल्पसंख्याक अधिकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेला महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh प्रमुख उपस्थिती लावणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय महासचिव Naseem Siddiqui तसेच अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष Afzal Farooque हेही उपस्थित राहणार आहेत.