जैताई प्रांगणात स्त्रियांसाठी मोफत आयुर्वेदिक आरोग्य महायज्ञ , घटस्थापनेपासून महाष्टमीपर्यंत शिबिराचे आयोजन; नाडी परीक्षण, रोगनिदान व औषधोपचाराची सुविधा

वणी : 

शहराचे ग्रामदैवत श्री जैताई मंदिराच्या प्रांगणात नवरात्रोत्सवानिमित्त विश्वयोग आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरतर्फे ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान स्त्रियांसाठी मोफत आरोग्य तपासणी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता जैताई संस्थान कमिटीच्या अध्यक्षा भारतीताई सरपटवार यांच्या हस्ते झाले.
यावेळी शुद्ध आयुर्वेदिक औषधांपासून तयार केलेल्या कौस्तुभकांती अभ्यंग तेल, केश्य तेल, सुगंधी उटणे, हळदी-चंदन साबण व अत्तर यांचा समावेश असलेल्या ‘वैद्य चरपे दिवाळी किट’चे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बंडुभाऊ भागवत, सुनील इंदुवामन ठाकरे, सुशील चरपे, वैद्य सुवर्णा चरपे, सुनंदा शिलमनवार व प्रकाश मडावी उपस्थित होते.
शिबिरात नऊ दिवस मोफत उपाशीपोटी नाडी परीक्षण, आयुर्वेदिक पद्धतीने रोगनिदान, अग्निकर्म, विद्धकर्म, लेपन, नस्योपचार आणि औषधोपचार केले जाणार आहेत. तसेच दमा रुग्णांसाठी कोजागिरी औषधी आणि उंची वाढीसाठी औषधोपचारासंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, वंध्यत्व, अंगावरून पांढरे पाणी जाणे, चेहऱ्यावरील वांग, मुरुमे आणि केसगळती यांसारख्या समस्यांसाठी आयुर्वेदिक निदान व उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्य. सुवर्णा चरपे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post