स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी

वणी /

येथील सावरकर चौकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाला माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरराव पावडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह दीपकजी नवले, विभाग संपर्कप्रमुख प्रशांत भालेराव, नगर सहकार्यवाह कवडूजी पिंपळकर, नगर कार्यकारिणीचे विशालजी काळे, गजानन कौरासे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सावरकर जयंती समितीचे प्रमुख संजय दोरखंडे, समिती सदस्य सुरेश मोरे, अनिल पोटे, सुनील ठाकरे, एकनाथ मांडवकर, डॉ. अनिरुद्ध वैद्य, संतोष इनमुलवार, डहाळकर काका, विशाल झाडे, पुरुषोत्तम आक्केवार, रहीम शेख, सोनू शेख व अन्य सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, समाजकार्य व विचारांचा गौरव करण्यात आला. उपस्थितांनी सावरकर यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post