वणीत बजरंग दलाचे राष्ट्रपतींना निवेदन; विविध सामाजिक व सुरक्षा प्रश्नांवर लक्ष वेधले , अवैध अतिक्रमण, धर्मांतर आणि महिलांच्या सुरक्षेबाबत व्यक्त केली चिंता

वणी : (प्रतिनिधी)

देशातील विविध सामाजिक, सुरक्षा आणि कायदेशीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महामहिम राष्ट्रपती महोदया यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात देशात वाढत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या समाजविघातक प्रवृत्ती, अवैध अतिक्रमणे आणि काही संघटित घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात काही घटनांचा उल्लेख करत सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः “लव्ह जिहाद”, जबरदस्ती धर्मांतर, महिलांवरील अत्याचार तसेच काही शैक्षणिक संस्थांशी संबंधित प्रकरणांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
तसेच, देशातील विविध शहरांमध्ये वनजमीन, सार्वजनिक जागा, रेल्वे व संरक्षण विभागाच्या जमिनींवर होत असलेल्या अवैध अतिक्रमणांचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. काही भागांमध्ये अल्पसंख्यांक समाजांवरील कथित अत्याचार आणि त्यातून होणाऱ्या स्थलांतराबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

*📌 प्रमुख मागण्या :*

▪️ कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई करावी
▪️ सार्वजनिक व सरकारी जमिनीवरील अवैध अतिक्रमणे हटवावीत
▪️ जबरदस्ती धर्मांतरासारख्या गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी कडक कायदे लागू करावेत
▪️ संवेदनशील व आदिवासी भागांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था उभारावी,
निवेदनाच्या शेवटी देशात शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल प्रखंड वणी, जिल्हा पांढरकवडा (विदर्भ प्रांत) यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post