स्टिंग ऑपरेशन न्यूज :
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रादेशिक कला विभागातील नाट्य विभाग प्रमुख डॉ. मनोज उज्जैनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार्ट-१ च्या विद्यार्थ्यांनी ‘अशी ही बनवाबनवी’ ही लघुनाटिका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
प्रा. डॉ. राहुल हळदे व प्रा. डॉ. अमोल पाणबुडे यांच्या सहकार्याने सादर झालेल्या या नाटिकेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटिकेत डॉ. दिलीप अलोने, आशिष इखार, प्रतीक बुडूखले, धनश्री लंगडे, शंतनू सोलव, तेजस लहाने, अनिरुद्ध नरखेडकर, संजना शिरभाते, विवेक साईरीसे यांनी आपल्या भूमिकांना न्याय देत विशेष प्रशंसा मिळविली.
नाटिका सादरीकरणानंतर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सादरीकरणातील विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक सुरेश बारसे व विश्वनाथ निळे यांनी विद्यार्थ्यांना नाट्य सादरीकरणाविषयी मार्गदर्शन करत अभिनयातील बारकावे समजावून सांगितले.
यावेळी डॉ. दिलीप अलोने, आशिष इखार व प्रतीक बुडूखले यांनी एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. या संपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून नाट्यकलेबद्दलची आवड अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.