वणीत भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य बाईक रॅली; उत्साहाचा जल्लोष

वणी : प्रतिनिधी

भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त वणी शहरात अखिल ब्राह्मण समाजाच्या वतीने उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने स्थानिक जैताई मंदिर येथून शेकडो समाजबांधवांच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
या रॅलीद्वारे समाजातील एकता, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जेचा संदेश देण्यात आला. शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण आणि जयघोषामुळे संपूर्ण वातावरण परशुराममय झाले होते. युवकांचा उत्साह आणि शिस्त विशेष लक्षवेधी ठरली.
या मंगलमयी सोहळ्याचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरवून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
कार्यक्रमाला मनसेचे नेते राजू उंबरकर, मुन्ना महाराज तुगनायक, डॉ. स्वानंद पुंड, मूलचंदजी जोशी, सुभाषजी तिवारी, सुरेशजी देशकर, संकेतजी अलोने, कवाडे सर,अरुण कावडकर, अमितजी उपाध्ये, मिलिंदजी आम्लेकर, श्रीवल्लभ सरमोकदम, ऍड. प्रविण पाठक, महेश पांडे, अजय चन्ने आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
कार्यक्रमाचे प्रभावी समालोचन सुरेशजी देशकर यांनी केले, तर शेवटी संकेतजी अलोने यांनी उपस्थित मान्यवर व समाजबांधवांचे आभार मानले. या यशस्वी आयोजनाबद्दल अखिल ब्राह्मण समाजाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post