शेतात गळफास घेऊन इसमाची आत्महत्या; वणी परिसरात खळबळ , कवडू खोके यांचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

वणी :

तालुक्यातील लाठी (बेसा) येथील रहिवासी कवडू पांडुरंग खोके (वय ४०) यांनी दि. १५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या शेतात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ४ ते ५ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. काही वेळानंतर ही बाब घरच्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ शिरपूर पोलीस स्टेशनला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपासासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय, वणी येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
दरम्यान, कवडू खोके यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post