रोहित वनकर यांची यवतमाळ जिल्हा समन्वयकपदी निवड

वणी :

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत यवतमाळ जिल्हा समन्वयक म्हणून येथील नूरजहाँ बेगम सलाम अहमद आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रोहित सुधाकर वनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यवतमाळ जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये ‘करिअर कट्टा’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांना करिअरविषयक योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. वनकर यांनी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, संस्थेचे सचिव डॉ. राणानूर सिद्धिकी, प्राचार्य डॉ. अविनाश घरडे, ऍड. निलेश चौधरी, डॉ. दिनेश खेडकर तसेच डॉ. प्रवीण कुलकर्णी यांचे आभार मानून त्यांना या यशाचे श्रेय दिले आहे.
या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाची नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post