⚡ विजेचा घात! पाणी भरताना महिलेचा दुर्दैवी मृत्य ूशास्त्रीनगर वणीत हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

वणी | प्रतिनिधी :

वणी शहरातील शास्त्रीनगर परिसरात आज एक दुर्दैवी घटना घडली असून विजेच्या धक्क्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक महिलेचे नाव सौ. छाया नंदकिशोर घुले (वय ३५, रा. शास्त्रीनगर ,मोक्षधाम जवळ वणी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या आज आपल्या घरी मोटारद्वारे पाणी भरत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या आकस्मिक घटनेमुळे शास्त्रीनगर परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी पुढील तपास वणी पोलीस स्टेशन करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post