माजी सरपंच नथ्थूजी मोते यांचे उपचारादरम्यान निधन, रविवारी सकाळी ११ वाजता होणार अंत्यसंस्कार

वणी /

तालुक्यातील मानकी येथिल माजी सरपंच नथ्थूजी मोते यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. दोन दिवसांपासून नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.
ग्रामविकास व सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासकामांना गती दिली. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा, नातेवाईक व असंख्य आप्तस्वकीय आहेत.
त्यांचे अंत्यसंस्कार रविवारी सकाळी ११ वाजता होणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना. 🙏

(स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!)

Post a Comment

Previous Post Next Post