वणी /
येथिल राजस्थानी महिला मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अपंग निवासी शाळेत अन्नधान्य व विविध खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून शाळेतील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांना हातभार लागला असून मंडळाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत खेळही खेळण्यात आले यावेळी मुलांनीही खुप आनंद घेतला.
त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा संकल्प महिला मंडळाने व्यक्त केला. शाळेच्या वतीने मंडळाचे आभार मानण्यात आले.
यावेळी निवासी शाळेच्या प्राचार्या मिलमिले सर, प्रमुख पाहुण्या स्नेहलता चुंबळे, मंचाच्या अध्यक्षा सौ. संगीता खटोड उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे संचालन सौ. प्रेक्षा कटारिया यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ हेमा अग्रवाल यांनी केले.
यावेळी मंडळाच्या सदस्या सौ. तरुण जैन, सौ. किरण कपूर, सौ. कल्पना छाजेड, सौ. विजया मुनोथ, सौ. हेमा पोद्दार उपस्थित होत्या.