प्रभाग २ (ब) मध्ये राजू तुराणकर यांची जनमताचा कौल मिळविण्याकडे वाटचाल;

वणी /

नगर पालिका निवडणुकीसाठी काही तास शिल्लक असतांनाच प्रभाग क्रमांक २ (ब) मधून राजू तुराणकर यांनी शिवसेना उबाठा गटाकडून तगडे आव्हान उभे केले आहे. त्यांनी प्रचारात आघाडी मिळवली आहे. राजू तुराणकर हे माजी नगरसेवक असून त्यांना नगर पालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर ते प्रभागाचा उत्तम विकास साधू शकतात. तसेच नागरिकांची कामे करण्याचीही तळमळ त्यांच्यात दिसून येते. हसमुख असलेले राजू तुराणकर हे सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. नागरिकांसाच्या सुखदुःखात ते नेहमी धावून जातात. समाजकार्यात तर ते हिरीरीने पुढाकार घेतात. नागरिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याला ते प्राधान्य देतात. त्यांच्या विजयाने प्रभागातील नागरिकांना एक तडफदार लोकप्रतिनिधी मिळू शकतो. राजू तुराणकर हे नगरसेवक म्हणून एक चांगली निवड ठरू शकतात, अशी चर्चा प्रभागात आहे.
राजू तुराणकर यांचा प्रभागात दमदार प्रचार सुरु आहे. पायाला भिंगरी बांधल्यागत ते प्रभाग पिंजून काढत आहेत. मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत आहेत. मतदारांकडूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे (उबाठा) ते निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने त्यांची विजयाची पकड मजबूत मानली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्याची त्यांची तळमळ सर्वश्रुत आहे. अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमी दंड थोपटले आहे. प्रशासनाला जागे करण्याचं काम त्यांनी आपल्या आंदोलनांमधून केलं आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवितांना त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तरी त्यांनी पर्वा केली नाही.

लोकांसाठी आवाज उठविणारे तडफदार व्यक्तिमत्व असलेले राजू तुराणकर आता नगर पालिका निवडणुकीच्या रणमैदानात उतरले आहेत. लोकांचा हाक्काचा प्रतिनिधी बनून प्रभागाचा सर्वांगीण विकास, प्रभागातील समस्या व लोकांची कामे करण्याच्या प्रबळ इच्छेने ते नगरसेवक पदाची निवडणूक लढण्यास प्रवृत्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची दावेदारी सबळ मानली जात आहे. त्यांच्या विजयाने प्रभागाला एक चांगला नगरसेवक व लोकांची तळमळीने कामे करणारा लोकसेवक मिळणार असल्याचीही चर्चा प्रभागात रंगू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post