वणी :
नगर परिषद वणी निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शासकीय मैदानावरून शक्ती प्रदर्शनाची रॅली काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने स्त्री पुरुष मतदार उपस्थित होते. ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरून निघून परत शासकीय मैदानावर आली. यावेळेस जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, माजी आमदार सजिवरेड्डी बोदकुरवार, विजय पिदुरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, यांनी सभेला संबोधित केले. महसूल मंत्री बावनकुळे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित मतदारांना देऊन शासकीय जागेवर राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाना जमिनीचे पट्टे प्रदान करणार, वणी शहरातील १०० महिला बचत गटांना १ लाख रुपये अनुदान जाहीर केले, गरिबशेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, ४० वर्षांपासून झुडपी जंगल जागेवर बसलेल्या नागरिकांना हक्काचे पट्टे देण्यात येणार, शेतात जाणारे पांदणरस्ते तात्काळ बांधणार, वणी शहरात सि सि टिव्हि चे जाळे करून शहराला सुरक्षित करणार असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शहर अध्यक्ष अॅड. निलेश चौधरी यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा
उपाध्यक्ष रवी बेलुरकर यांनी केले.
यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, जिल्हा अध्यक्ष अॅड. प्रफुल चैव्हान, दिनकर पावडे, संजय पिंपळसेंडे, शहर अध्यक्ष अॅड. निलेश चौधरी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम, यासह २९ नगरसेवक पदाचे उमेदवार, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.