वणी /
"संगीत हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये संगीत ही एक उपचार पद्धती आहे. मानसिक शांती प्रदान करण्याचे ते सगळ्यात सुंदर साधन आहे. जीवनामध्ये या दृष्टीने संगीताची आराधना आणि उपयोग व्हायला हवा." असे विचार वणी येथील सुप्रसिद्ध संगीत तज्ञ अजित खंदारे यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक महिन्यात आयोजित होत असलेल्या माझं गाव माझा वक्ता या मालिकेच्या ५१ व्या पुष्पामध्ये मानवी जीवनात संगीताचे महत्त्व या विषयावर ते व्यक्त होत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ. दिलीप अलोणे तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के उपस्थित होते.
उपस्थित होते.
प्रास्ताविकात व्याख्यानमालेच्या इतिहासावर प्रकाश टाकल्यानंतर आपल्या शांत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी सादरीकरणात अजित खंडारे यांनी संगीताचा इतिहास, गायन,नृत्य, अभिनय, वाद्य इत्यादी विषयातील विविध अंगी विकास, विविध कालखंडातील भारतीय संगीताची अवस्था, आज शास्त्रीय आणि दर्जेदार संगीताच्या बाबतीत जनसामान्यांमध्ये असणारा निरुत्साह, संगीताची वैद्यकीय उपयुक्तता आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मन:शांतीसाठी असणारा संगीताचा लाभ अशा विविध विषयांवर उपस्थित आमचे मार्गदर्शन केले.
अशोक सोनटक्के यांनी वणी मध्ये असणाऱ्या पूर्वापार संगीत समृद्धतेवर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ . दिलीप अलोणे यांनी खंदारे यांच्या व्यासंगाचे आणि वणीच्या नवीन पिढीला घडवत असणाऱ्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या आरंभी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने वैदर्भीय बोलीला राज्यात आणि राज्याच्या बाहेर प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या मिर्झा रफी बेग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघ सदस्य गजानन भगत यांनी तर आभार प्रदर्शन विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ.अभिजित अणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी विशेष परिश्रम घेतले.