विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेना (शिंदे)पक्षात मध्यरात्री पक्षप्रवेश

वणी :

वणी नगर परिषद निवडणूकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून प्रभाग क्रमांक ५ मधील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मध्यरात्री १ वाजता जटा शंकर चौकातील शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. 

 निवडणूक प्रभारी व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा संघटक विजय चोरडिया, शिवसेना नेते विनोद मोहीतकर, बंटी ठाकूर आणि सचिन देशपांडे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. 
या वेळी सचिन पडोळे, संदीप खोब्रागडे, अमर कन्नकुंटलावार, सिद्धू डगावकर, विजय वाढई यांच्यासह विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे)पक्षावर विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
अलीकडील काळात वणी शहरासह ग्रामीण भागातही शिंदे गटाचा वाढता कल स्पष्टपणे जाणवत असून स्थानिक कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट दिसत आहे. प्रत्येक प्रभागातून आणि भाजप, शिवसेना (उबाठा), कॉंग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांचा होत असलेला वाढता पक्ष प्रवेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची पकड अधिक मजबूत करणारा ठरतोय असे दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post