आता ऍड. कुणाल चोरडिया यांनी शिवसेना (शिंदे) गटाची धुरा सांभाळली , प्रत्येक प्रभागात कॉर्नर सभेला गर्दी, वणीत शिंदे सेनेकडे जनतेचा कौल...

वणी : 

काही दिवसांपूर्वी वणीत शिवसेनेचे (शिंदे गट) काहिच अस्तित्व नसतांना आधी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांनी भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेना (शिंदे गट) ला मजबूती मिळाली आणि ऐन नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षवाढीस सुरुवात झाली. पाहता पाहता आठ दिवसांत इतर पक्षांतील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक शिवसेना (शिंदे) गटात जोडले गेले. आता तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड कुणाल चोरडिया यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेची धुरा सांभाळली. त्यांच्या प्रत्येक सभेला गर्दी होत आहे. जणू काही शिवसेना (शिंदे) गटाकडे जनतेचा कौल दिसून येत आहे.
 शुक्रवारी रात्री प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेला मतदारांनी मोठी गर्दी केली होती. नगरसेवक पदाचे उमेदवार धर्मा काकडे व सौ. किरण कुत्तरमारे, तसेच अध्यक्ष पदाच्या उमेदवार कु. पायल तोडसाम यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या या सभेला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.
सभे दरम्यान नागरिकांनी प्रभागातील मूलभूत सुविधा जसे की, रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, विज आणि स्वच्छता यासंबंधित विविध अडचणी मांडल्या. उमेदवारांनी या सर्व समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यावर ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
 “विकासाला प्राधान्य आणि नागरिकांची सेवा हेच आमचे ध्येय,” असे उमेदवारांनी यावेळी सांगितले.

या सभेला ऍड.कुणाल चोरडिया, विनोदभाऊ मोहितकर, शम सिद्धिकी, मुरलीधर कुत्तरमारे इत्यादी मान्यवरांनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन दिले.

  प्रभाग १३ मध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद तसेच शिवसेनेच्या प्रत्येक प्रभागातील कॉर्नर सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने शिवसेना (शिंदे) गटाकडे वणी कर जनतेचा कौल दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post