अखेर, मित्रासाठी मित्र निघाला मैदानात... प्रभाग ८ चे शिवसेना उमेदवार राजु रिंगोले यांच्या विजयाचा शंखनाद! राजु रिंगोले यांचा तो मित्र कोण? वाचा बातमी...

वणी :-

वणी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेना (शिंदे गट)चे युवा उमेदवार राजू रिंगोले यांनी आपल्या प्रचार मोहिमेला वेग दिला आहे. "प्रभागाचा विकास म्हणूनच प्रभागामध्ये सर्वांच्या दारी एकमेव उमेदवार" या भावनेने राजू रिंगोले दिवस- रात्र प्रभागातील नागरिकांशी संपर्क साधत आहेत. शिक्षित आणि कार्यक्षम नेतृत्व असलेले राजु रिंगोले हे लोकांच्या पसंतीचे एकमेव युवा उमेदवार ठरत आहे. आता तर त्यांचा 'खास ' मित्र...उमेश... यांनी राजु रिंगोले यांना निवडून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ चे युवा तडफदार उमेदवार राजु रिंगोले यांच्याकडे सर्वांचे विशेष; लक्ष लागले आहे.

तसे तर राजु रिंगोले हे प्रभागातील प्रत्येक मतदारांच्या दारापर्यंत जाऊन आपल्या विकासाच्या अजेंड्याची माहिती देत जनतेशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. मात्र आता त्यांचा मित्र 'उमेश ' हे पाठिशी उभे झाल्याने राजू रिंगोले यांच्या विजयाचा गुलाल पक्का झालेला आहे. कारण राजू रिंगोले यांच्या प्रचाराची धुरा आता तर खुद्द 'उमेश पोद्दार' यांनी आपल्या हाती घेतली आहे.

प्रभाग- ८ मध्ये नागरिकांपर्यंत पोहचतांना "जनतेची हाक, मतदारांची साथ आणि प्रभागाचा विकास" हेच ब्रिद जोपासत, राजु रिंगोले प्रभाग पिंजून काढतांना दिसत आहे. त्यामुळे राजु रिंगोले मतदारांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post