शिवसेना (शिंदे) गटाच्या निवडणूक कार्यालयाचे विजय चोरडिया यांच्या हस्ते उद्घाटन

वणी : 

वणी नगर पालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे सर्वच राजकीय पक्षांचे नेते निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करुन प्रचाराला लागले आहे.
 गुरुवारी २० नोव्हेंबर ला 
दुपारी तिन वाजता जुनी स्टेट बँक जवळील राम मंदिर रोडवरील शिवसेना (शिंदे) पक्षाच्या निवडणूक कार्यालयाचे भव्य उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
उदघाटन प्रसंगी पक्षाचे नेते विनोद मोहितकर, प्रसाद ठाकरे, उमेश वैरागडे, राजु देवडे, हिमांशु बोहरा,  यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगराध्य, नगरसेवक पदाचे उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवारांना विजयी चोरडिया यांनी विजयाचा कानमंत्र दिला. त्यावेळी जय भवानी जय शिवाजी यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.

Post a Comment

Previous Post Next Post