शेवटच्या दिवशी शिंदेसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन, शिवसेना (शिंदे) तर्फे पायल तोडसाम यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरले नामांकन अर्ज

वणी :

 वणी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वतीने हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पायल तोडसाम व नगरसेवकांचे नामांकन अर्ज दाखल करून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत विशेषतः महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीत युवावर्ग ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. शिंदेसेनेच्या रॅलीची सुरुवात श्री रंगनाथ स्वामी देवस्थानातून झाली. तेथून चंद्रशेखर आजाद चौक, नटरात चौक, खाती चौक, टिळक चौक या मार्गे पुढे जात ही रॅली जैताई मंदिरात पोहोचली. 
या रॅलीचे नेतृत्व माजी आमदार विश्वास नांदेकार, जिल्हा संघटक विजय चोरडिया, विनोद मोहीतकर यांनी केले. जिल्हा समन्वयक हरिहर लिंगनवार, शिवराज पेचे, विक्रांत चचडा, शुभम गोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वणी नगरपालिकेची निवडणूक २ डिसेंबरला होणार असून सोमवारी नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अशातच शिंदेसेनेच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे लक्षवेधी रॅली वरुन बघायला मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post