अन्यथा, वंचितचे विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर 'झटका' आंदोलन,. वंचित चे नेते राजू निमसटकर यांचा निवेदनातून इशारा

स्टिंग ऑपरेशन न्यूज/ 

मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी आणि नागरिक हवालदिल झाले आहेत. महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवला असून, विजेचा 'अंधार' दूर करा, बळीराजाला दिलासा द्या. अन्यथा, वंचितच्या 'झटका' आंदोलनाला सामोरा जा, असा गर्भित ईशारा वंचितचे नेते राजू निमसटकर यांनी मारेगांव वीज वितरण विभागाला निवेदनातून दिला आहे.
वादळी हवामान सुरू होताच वीज खंडित होणे ग्रामीण भागासाठी जणुकाही नित्याचेचं झाले आहे. आधीच पावसामुळे सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातचं जीवापाड जपलेल्या शेत पिकाला शेतातील वीजेच्या लपंडावामुळे पाणी देता येत नाही. मात्र, या समस्यांकडे ना वीज वितरण विभागाचे लक्ष, ना लोकप्रतिनिधींचे लक्ष सर्वांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ही जनतेसाठी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे असेही निवेदनात म्हटले आहे. 
या दुर्दैवी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात 'अंधाराचे राज्य' निर्माण झाले असल्याचा गंभीर आरोपही वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू निमसटकर यांचे नेतृत्वात उप कार्यकारी अभियंता मारेगांव यांना दिलेल्या निवेदनातुन ,
मारेगाव तालुक्याचे ग्रामीण भागातील विशेष करून कुंभा परिसरातील शेतकरी बांधवांसाठी कुंभा येथे तातडीने स्वतंत्र वीज उपकेंद्र (Substation) स्थापन करावे, 
शेतकऱ्यांसाठी दिवसातून किमान ८ तास अखंडित वीज पुरवठा द्यावा, जीर्ण झालेले वीज तार, ट्रान्सफॉर्मर, खांब त्वरित बदलण्यात यावेत, वीज खंडित झाल्यास दोष दुरुस्तीसाठी तातडीच्या कार्यवाहीची वेळमर्यादा निश्चित करावी, इत्यादी चार मागण्यांची मागणी केली आहे. 

मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना सोबत घेऊन मारेगाव येथील महावितरण कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे भेदक 'झटका' आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा राजू निमसटकर यांनी स्टिंग ऑपरेशन न्यूज सोबत बोलताना प्रशासनाला दिला आहे. याबरोबरच होणाऱ्या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांना महावितरण व प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

यावेळी वंचितचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांचेसह ज्ञानेश्वर मून, अनिल खैरे, अनंता खाडे, रवींद्र तेलंग, ज्ञानेश्वर देठे, संजय जीवने, रवी वनकर, प्राणशील पाटील, अमरनाथ तेलतुंबळे, गौतम दारुंडे, गौतम मालखेडे, डोमाजी हस्ते, राजानंद गांजरे, यशवंत भरणे,मुरलीधर जीवने, रमेश ताकसांडे,महेंद्र पाटील, यशवंत पाटील, नंदकुमार तामगाडगे, लक्ष्मीकांत तेलंग, रेखाकाटकर, शिला दारुंडे, अभिषा निमसटकर, कविता ताकसांडे, सुमितगेडाम, गौतम टाकसांडे, माणिकचंद दारुंडे, राजू पाटील, यांचेसह सिंदी येथील शेतकरी गजानन बोढाले, ज्ञानेश्वर ढवस, संतोष काळे, विनोद उमरकर, रत्नाकर डाखरे, चंद्रशेखर थेरे, रुपेश बाभळे, प्रमोद जीवतोडे, अनिकेत गाडगे, मनोज भगत, अमोल जिवतोडे, मनोज काळे,नामदेव जांभुळकर, प्रविण बोंडे इत्यादी मोठ्या संख्येने शेतकरी व वंचित चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post