वणी /
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात २८ ऑक्टोंबर रोजी नागपूर येथे एल्गार मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन २५ ऑक्टोंबर रोजी वणी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मुबिन शेख यांनी केले.
शेतकरी योध्दा शरद जोशी यांच्या अंगार मळ्याची माती कपाळाला लावून शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण या अन्यायाविरोधात नागपूर येथे २८ ऑक्टोंबर २०२५ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात व शेतकरी संघटनेच्या वतीने जाहिर नाम्यातील वचनांप्रमाणे ठाम मागण्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतीमालाला एम.एस.पी.२० टक्के बोनस देण्यात यावे, संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांची सरसकट ३ लाखा पर्यंत कर्ज माफी करण्यात यावी आणि इतर प्रलंबित असलेल्या मागण्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.या मागण्या साठी जात - पात,धर्म,पंथ आणि पक्षपात बाजूला ठेवून वणी, झरी,मारेगाव येथील शेतकरी बांधवांनी लाखोंच्या संख्येने नागपूर येथील २८ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या महा एल्गार मोर्चात सामील व्हा असे आवाहन मुबिन शेख यवतमाळ उपजिल्हा प्रमुख जनशक्ती प्रहार पक्ष यांनी केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे देवराव धांडे, सतिश देरकर, सय्यद अहमद यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.