वणी :
नगरपरिषद निवडणुकीचे वारे जोर धरू लागले असून, वणी शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपा युवा नेते व जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कुणाल विजय चोरडिया यांचे नाव प्रभाग क्रमांक १० (ब) मधून संभाव्य उमेदवार म्हणून जोरदार चर्चेत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. चोरडिया यांनी सांगितले की —
> “पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून जी कोणतीही जबाबदारी माझ्यावर सोपविली, ती मी पूर्ण प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडेन. पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्य करणे हेच माझे कर्तव्य आहे.”
नगराध्यक्षपदासाठी त्यांचा विचार झाला होता आणि त्यांचे नाव शहरात चर्चेचा विषय बनले ; मात्र या वेळच्या आरक्षणानुसार ते पद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठरल्याने अॅड. चोरडिया यांनी शासनाच्या निर्णयाचा सन्मान व्यक्त केला आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक १० (ब) मधील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी अॅड. कुणाल चोरडिया यांच्या नावाबाबत आनंद व्यक्त केला असून, अनेक इच्छुकांनी “कुणाल बाबूसाठी माघार” घेत स्वतःहून आपली संधी त्यागण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरावर भक्कम समर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आता प्रश्न असा उरतो की — 👉
📌 — स्टिंग ऑपरेशन न्यूज, वणी प्रतिनिधीमार्फत प्राप्त माहिती