वणी /
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता असताना, वणी विधानसभा क्षेत्रातील वेल्हाळा(लाठी) नांदेपेरा जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. हे सर्कल सर्वसाधारणसाठी राखीव असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाकडून शिवसेनेचे ज्येष्ठ १९८८ पासून पक्षात सक्रिय राहिलेले माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश प्रभाकरराव कऱ्हाड यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
वणी तालुक्यातील वेल्हाळा(लाठी) नांदेपेरा जिल्हा परिषद सर्कल शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. प्रकाश कऱ्हाड हे १९८८ पासून पक्षात सक्रिय राहिलेले, संपूर्ण सर्कल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जाळे तयार करणारे , आणि १९९७ मध्ये पहिल्यांदा वणी पंचायत समितीवर भगवा फडकणारे
जेष्ठ शिवसैनिक तालुका संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यांचा दांडगा संपर्क , मोठ्या प्रमाणावर मित्र परिवार लक्षात घेता शिवसेना त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुमारे तीन वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुका आता कधीही जाहीर होऊ शकतात. त्यामुळे, प्रकाश कऱ्हाड यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने, या महत्वपूर्ण सर्कलमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेला पुन्हा एकदा ही जागा राखण्यात यश मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.