सर्पमित्रांनी दिले कोब्रा जातीच्या सापाला जीवनदान , मुकुटबन पोलिस ठाण्यात दिसला "कोब्रा" आणि...

वणी /

मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना कोब्रा जातीचा साप दिसला आणि एकच खळबळ उडाली. काही कर्मचाऱ्यांनी त्या सापाला पकडण्यासाठी मुकुटबन येथील प्रसिद्ध सर्पमित्र जगदीश कुडलवार यांना पाचरण केले. जगदीश यांनी वेळ न लावता त्या कोबरा जातीच्या सापाला खूप शिफातीने पकडले. 
सर्पमित्र जगदीश कुडलवार यांनी आजपर्यंत विषारी निमविषारी आणि बिनविषारी सापांना सुरक्षितपणे वन विभागामध्ये रीतसर रित्या नोंदणी करून जंगलामध्ये सोडले.
 यावेळी जीवन सृष्टी सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे सर्पमित्र हरीश कापसे, गजानन क्षीरसागर, अविनाश हीवलेकर, तोहीद शेख, सुरज पारशिवे , मनोज मोंढे, अर्जुन राठोड, आर्यन कवाडे, कार्तिक नाईनवार, सोयल सय्यद व संकेत परचाके तसेच मुकुटबन पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post