आता शिंदे सेनेचा "वाघ" करणार नगर पालिका परिसरात कर पावतीची होळी, पत्रकार परिषदेत दिली माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी माहिती

वणी /

सामान्य जनतेवर अवाजवी व जिवघेणा कर लादल्याने सोमवारी २९ सप्टेंबर ला नगर पालिका परिसरात मालमत्ता कर पावतीची होळी करणार असल्याची माहिती शिवसेना (शिंदे) चे जिल्हा समन्वयक माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी २२ सप्टेंबर ला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे (शिंदे) जिल्हा समन्वयक विश्वास नांदेकर यांनी सांगितले की,
मागील काही वर्षांपासून वणी नगर परिषदमध्ये चाललेल्या अनागोंदी व भ्रष्टाचारी कारभारामुळे डबघाईस आलेल्या नगर परिषदेस वाचवण्याकरिता सामान्य जनतेवर अवाजवी व जीवघेणा कर लादण्याचे नियमबाह्य कृत्य नगरपरिषद प्रशासका द्वारे केल्या गेले आहे. रस्ते आणि भूमिगत नाल्या व बगीचे यालाच विकास समजुन मागील काही वर्षांपासून शासकीय योजनेतून आलेल्या पैशांचा व नगर परिषद मालमत्ता कराचा अपव्यय मोठया प्रमाणात केला आहे. मूलभूत गरजा असलेले पाणी मागील अनेक वर्षापासून जलशुध्दीकरण केंद्र मृत अवस्थेत असून लोकांना ब्लिचिंग व आलम सारख्या पावडर चा वापर करून लोकांना पाणीपुरवठा केल्या जात आहे वणी शहरात किडनीचे आजार त्वचा रोग, पिलिया अशा अनेक जीवघेण्या आजाराचे रुग्ण वाढले असताना या गोष्टी कडे दुर्लक्ष करून स्थानिक कराचा व ईतर शासकीय निधीचा गैर वापर मागील जनप्रतिनिधी व प्रशासकांनी मलाई मिळणाऱ्या कामावर केलेले आहे. जनतेला विचारात न घेता निवडक बिल्डर्स व डेव्हलपर्सना व कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने नगर परिषद क्षेत्राची हद्दवाढ करण्यात आली असून विविध योजना व विकासकामांचे प्रारूप आखून सरकारी खर्चाने पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. वणी नगर परिषद तिजोरीत पैशाचा खडखडाट असताना सुद्धा निर्मानुष्य हद्दवाढीचा घाट घातला आहे. त्यामुळे नगरपरिषदेसमोर कर पावती ची होळी शिवसेनेच्या वतिने करण्यात येणार असल्याचे जिल्हा समन्वयक माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
पत्रकार परिषदेत वणी तालुका अध्यक्ष प्रसाद ठाकरे, शहर प्रमुख शिवराज पेचे, महिला शहरप्रमुख वसुधा ताई ढगे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post