वणी /
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील राजुर येथे एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.
रियाज अहमद वाट्या शाह(४१) असे मृतकाचे नाव आहे.
शनिवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास रियाज ने आपल्या राहत्या घरी गळफास लावला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मृतक रियाज च्या पाठीमागे पत्नी अहमदुन(३९), व पाच मुले, समिर (१६), अयान (१२),परवेज (१०),सरताज (५)व सहमद (४)असा आप्त परिवार आहे. रियाज ने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.