वणी /
*नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केळापूर येथील जगदंबा देवस्थानात मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. दररोज हजारो भक्त माता जगदंबेच्या दर्शनासाठी येत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने निनादत आहे.
मंगळवारी पांढरकवडा येथील सम्राट निवास आखाडा वॉर्ड येथे नव मित्र दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने लखबीरसिंग लख्खा यांचा भव्य जगराता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कुणाल विजय चोरडिया उपस्थित होते यावेळी मंडळाच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहरााज्यमंत्री श्री. हंसराज अहिर, त्यांचे सुपुत्र रघुवीर अहिर, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. प्रतिभाताई धानोरकर, पांढरकवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजु तोडसाम, तसेच दिनकरराव पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या कार्यक्रमानंतर मा. हंसराजी अहिर आणि त्यांचे पुत्र श्री. रघुवीर जी अहिर यांच्यासह अॅड. कुणाल चोरडिया यांनी केळापूर येथील जगदंबा देवस्थानाला आई जगदंबेच्या दर्शनासाठी भेट दिली या प्रसंगी जगदंबा देवस्थान ट्रस्टचे प्रमुख शंकरराव बडे यांच्या हस्ते अॅड. कुणाल चोरडिया यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सन्मान केला. या वेळी देवस्थानचे पदाधिकारी, मान्यवर व भाविक शुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.