वणी ते १८ नंबर पुलापर्यंतचे खड्डे बुजवले नाही तर रास्तारोको आंदोलन, पेटूरच्या सरपंचांनी दिला चार दिवसाचा अल्टिमेट

वणी /

वणी ते कायर मार्गावर जिवघेणे खड्डे पडले आहेत सदर रस्त्यांवरुन जायचे तरी कसे? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. याबाबत अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या सुध्दा प्रसिद्ध झाल्या आहे मात्र प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही.  
मात्र आता नागरीकांमध्ये प्रशासनाविरोधात चिड निर्माण झाली असून आता आंदोलनाचे हत्यार उपसले जाणार आहे. 

पेटूर येथिल सरपंच व तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रविण झाडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी आज दिनांक २ सप्टेंबर ला सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वणी ते कायर मार्गावर १८ नंबर पुलापर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. सदर रस्त्याचा भार १२ ते १५ टनांपर्यंत असताना ५० टन वजनाचे आयव्हा ट्रक चालतात त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. सदरचे खड्डे चार दिवसांचे आत बुजविण्यात आले नाही तर सर्व पेटूरवासीयांना घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post