वणी /
वणीत धार्मिक असो किंवा सामाजिक कार्यक्रमात पक्षभेद न करता राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र येऊन सहभागी होतात तर काही कार्यक्रमात सेवाभावी वृत्तीने नास्ता या पाणी वाटप करतात.
शहरातील आंबेडकर चौक येथील मोठा मारोती मंदिर परिसरात दरवर्षी प्रमाणे यंदाही शनिवारी तान्हा पोळा निमित्त भव्य नंदी बैल पोळा उत्सव समितीच्या वतीने भरविण्यात आला. या तान्ह्या पोळ्यात आलेल्या बालगोपाळांना (शिवसेना ,बाळासाहेब उद्धव ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य सुभाष शेंडे यांनी स्थानिक आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध पिण्याचे पाण्याच्या बाटल व पार्ले जी बिस्कीट चे वाटप केले.
अजिंक्य शेंडे हे नेहमीच सामाजिक कार्यात भाग घेतात त्यांच्या या पाणी वाटप कार्यक्रमाची स्तुती केली जात आहे.
पाणी वाटप कार्यक्रमात मनोज वाकटी, आकाश खंडाळकर , कारण क्षीरसागर, कुंदन पेंदोर, गौरव पांडे, गोलू सिडाम, श्रीकांत सुसकर यांनी सहकार्य केले.