वणीत पोळा सण उत्साहात साजरा, प्रथम बक्षिसाचे मानकरी ठरले श्रीकांत पोटदुखे, विजय चोरडिया यांनी मानले बळीराजांचे आभार....

वणी /

दरवर्षी प्रमाणे यंदाही वणीच्या शासकीय मैदानावर बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. 
यंदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कृषीपरंपरेत बैलजोडी आणि गो-धन हे शेतकऱ्याचे खरे साथीदार आहे. बैलपोळ्याच्या या मंगलदिनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यासाठी विजयकुमार चोरडिया हे दरवर्षी पुढाकार घेत असतात.

भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य विजयकुमार चोरडिया, आमदार संजय देरकर, राजाभाऊ पाथ्रडकर, माजी पोलीस पाटील नितीन शिरभाते, राजाभाऊ बिलोरिया, ऍड. प्रविण पाठक, विशाल दुधबळे, शिवसेना शहरप्रमुख विनोद ढुमने व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत
उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
 यात प्रथम बक्षीसाचे मानकरी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी येरणे आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी पचारे ठरले.
प्रथम बक्षीसाचे मानकरी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, आपल्या बैलजोडी सह 

अनुक्रमे प्रथम दुतीय तृतीय 3100, 2100, 1100 रुपये रोख देऊन मान्यवरांच्या हस्ते बळीराजाचा गौरव करण्यात आला तसेच शंभू नावाच्या सर्जा राजाला प्रोत्साहन पर बक्षीस प्रधान करण्यात आले. महाप्रसाद वाटपाणे या बैलपोळ्याची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post