"शेतकऱ्यांचा सातबारा कोरा" या मागणीसाठी एक दिवस ग्रामपंचायत बंद आंदोलन

वणी /

माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी काही दिवसापूर्वी आंदोलन केले तसेच उपोषणही केले परंतु सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करिता अद्यापही जाग आलेली नसल्याने आता आंधळ्या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्रभर गुरुवारी (ता. २४) जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले आहे याच धर्तीवर वणी तालुक्यातही सरपंच संघटनेच्या वतीने गुरुवारी दिनांक २४ जुलै ला एक दिवस ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामुळे आज वणी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज दिवसभरासाठी बंद राहणार असून याबाबतचे निवेदन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती सरपंच संघटनेचे वणी तालुकाध्यक्ष प्रविण झाडे यांनी "स्टिंग ऑपरेशन न्यूज" ला दिली.

Post a Comment

Previous Post Next Post