वणी /
वणी पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार मालमत्तेचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार साहील कैलाश पूरी, वय २० वर्षे, रा. सेवानगर वणी याचेवर पो.स्टे. अभिलेखावर चोरी, जबरी चोरी तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न असे बरेच गुन्हे नोंद असून, त्याचे वर्तनामध्ये कोणताही सूधार होत नसल्याने व दिवसेंदिवस त्याची गुन्हे करण्याची प्रवृत्तीत वाढ होत असल्याने, त्यास मा. उपविभागीय अधिकारी वणी, यांच्या आदेशावरून कलम ५६ (१), (अ), (ब) महाराष्ट पोलीस अधिनियम, दिनांक २३/०६/२०२५ अन्वये सहा महीण्या करीता तडीपार करण्यात आले आहे.
तडीपारीत साहिल पुरी यास यवतमाळ जिल्हा तसेच वणी तालूक्यास लागून असलेल्या इतर जिल्ह्यातील लगतचे तालूके वरोरा, भद्रावती, कोरपणा तालूक्याचे हद्दीचे बाहेर जाण्याबाबत आदेश पारीत झाला त्याप्रमाणे तडीपारीत साहील कैलाश पूरी, यास दिनांक ०१/०७/२०२५ रोजी सदर आदेशाची एक प्रत तामील करण्यात येवून, तडीपारीत साहिल कैलाश पुरी यास त्याचे नातेवाईकांकडे पोलीस स्टेशन उमरेड, जि. नागपूर हद्दीत सोडण्यात आले.
सदरची कार्यवाही गणेश किंद्रे उपभिागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक वणी, पोउनि/ धिरज गुल्हाने, पो.कॉ. /मोनेश्वर, वसीम, कुडमेथे, मेश्राम, नंदकुमार यांनी पार पाडली.