वणी :
वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयांच्या संस्कृत विभागाद्वारे आषाढ शुद्ध प्रतिपदा २६ जून रोजी कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी तनीषा सहारे (ऋतुसंहारम्) ईशा पारशिवे ( विक्रमोर्वशीयम् ) सम्यक् तामगाडगे ( अभिज्ञान शाकुंतलम् ) साक्षी सोनेकर ( कुमारसंभवम् ) प्रतीक्षा जोशी ( मालविकाग्निमित्रम् ) या अंतिम वर्षाच्या आणि सुखदा बुजोणे ( रघुवंशम् ) या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी महाकवींच्या विविध साहित्यकृतींचा थोडक्यात परिचय करून दिल्यानंतर संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी विविध दंतकथांच्या माध्यमातून महाकवींच्या जीवनाचा परिचय करून देत मेघदूतम् आणि त्यातील आषाढस्य प्रथम दिवसे... ! या उल्लेखाच्या आधारे संपन्न होत असणाऱ्या कालिदास दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल करमरकर, कार्तिक देशपांडे आणि नितेश चामाटे या महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.