लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे

वणी /

भालर वसाहत ते लाठी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेच्या पार्श्वभूमीवर लाठी भालर वसाहत ग्रामपंचायत सदस्य ॲड.राहुल खारकर यांच्या नेतृत्वात स्थानिक लाठी गावातील नागरिकांनी घेतलेल्या रस्ता रोको आंदोलनाला लेखी आश्वासनानंतर यश मिळाले. वेल्हाळा बाजार रोड चौक येथे झालेल्या रस्ता रोको आंदोलनात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.हा रस्ता रोको जवळपास 4 तास चालला परंतु रोड संदर्भात कोणताही मार्ग निघत नसताना आंदोलनाला आमदार श्री. संजय देरकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली व वेकोली प्रशासनाशी चर्चेअंती वेकोली प्रशासनाकडून लाठी भालर वसाहत रोड करिता WBM रोडची तरतूद करून भविष्यात रोडचे नूतनीकरण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
   या आंदोलनात ग्रामपंचायत सदस्य रिना लाडे, अल्का बोरकुटे, ललिता गुंडुकवार यासह असंख्य महिलांचा,युवकांचा, ग्रामस्थांचा,युवा शक्ती क्रांतिकारी संघटना, संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांचा सहभाग दिसून आला. 
मागील अनेक महिन्यांपासून वेकोली प्रशासनाकडे रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी केली होती, परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन करण्यात आले.
     आंदोलनादरम्यान वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर रस्त्याचे काम 4 ते 5 महिन्यात करण्यात येईल असे लेखी आश्वासनाचे पत्र दिल्यामुळे आंदोलन थांबवण्यात आले. यावेळी शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे यांनी पोलीस प्रशासनासह कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post