वणी/ प्रतिनिधी –
शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्वाचे साधन पशुपालन आहे. कधी नैसर्गिक तर कधी कृत्रिम आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. विद्युत खांबावरील तार तुटल्याने दुधाळू मैशीचा (Animal) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना वणी तालुक्यातील (wani) मानकी गावात (manki) शनिवारी सायंकाळी पाच वाजताचे दरम्यान घडली.
दररोज प्रमाणे शनिवारी दिनांक १४ जुलै ला जनावरांना चराई करून सायंकाळच्या सुमारास घराकडे येताना गावावाजळ एका विद्युत खांबावरील तारा तुटून खाली पडलेल्या होत्या त्या विद्युत तारेचा करंट लागुन मैशीचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती मानकी गावातील शेतकरी गजानन विनोद वैद्य यांनी दिली. या घटनेत सदर शेतकऱ्याचे एक लाखाचे वर नुकसान झाल्याची माहिती त्यांनी 'स्टिंग ऑपरेशन न्यूज' ला दिली.
विशेष म्हणजे विद्युत खांबावरील तारा बऱ्याच दिवसांपासून तुटून पडलेल्या होत्या मात्र अचानक त्या तुटलेल्या तारेला करंट आला तरी कसा? असा प्रश्न उपस्थित झाला असून महावितरण ने देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
या घटनेची तक्रार वणी पोलीसात देण्यात आली असून त्याबाबतची माहिती महावितरण विभाग वणी व तलाठी मानकी यांना देण्यात आली असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे .
महावितरणने तात्काळ नुकसान भरपाई करावी अशी मागणी मानकी येथिल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.