वणी:
रेती तस्करी विरुध्द महसूल विभागाच्या सतत कारवाया सुरू आहे तरी भरदुपारी रेती तस्करी सुरू असल्याचे आज बुधवारी केलेल्या धडाकेबाज कारवाईने समोर आले आहे.
बुधवारी ७ मे रोजी सायंकाळी ४ वाजता वणी महसूल विभागातील नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, मत्ते, ग्राम विकास अधिकारी सुनील उराडे व महसूल सहाय्यक अशोक चौधरी, शिपाई गणेश राजुरकर, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वाहनचालक मनिष धुर्वे व पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत वणी - वरोरा बायपास वरील संविधान चौकात आयव्हा ट्रक पकडला. त्यामध्ये तब्बल ७ ब्रास रेती अवैधरित्या वाहून नेली जात असल्याचे उघड झाले.
महसूल पथकाने त्वरित कारवाई करत ट्रक क्रमांक MH- 34 BG- 4047 ताब्यात घेतला.
जप्त केलेला ट्रक हा वणीच्या एसटी डेपो आवारात उभा करण्यात आला आहे. पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया महसूल विभागाच्या वतीने सुरू आहे.