ब्रेकिंग न्यूज, वणी आगारात लालपरी दाखल...

वणी / 

 वणी आगाराला नवीन लालपरी बसेस मिळवण्याकरिता 
मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने १५ दिवसांपूर्वी परिवहन मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली होती. मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता मात्र आता परिवहन मंत्र्यांनी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या मागणीची दखल घेतली असून वणी आगाराला नवीन ५ बसेस मिळाल्या आहे त्यापैकी एक नवीन लालपरी बस आज मंगळवारी दुपारी वणी आगारात दाखल झाली असून उर्वरित चार बसेस वणी आगारात पोहोचणार आहे अशी माहिती प्राप्त झाली असून उद्या नवीन लालपरी बसेस चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

 *तब्बल ११ वर्षांनंतर नवीन लालपरी मिळाल्याने कर्मचारी वर्गात आनंद,*

वणी आगारातील लालपरी बसेस ची दैन्यावस्था झालेली आहे, जिथे तिथे रस्त्यावर बंद पडत असल्याने चालक, वाहक तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र आता वणी आगाराला नवीन पाच बसेस मिळाल्या असून आज मंगळवारी दुपारी एक लाल परी दाखल झाली आहेत तब्बल ११ वर्षांनंतर नवीन लालपरी बस दाखल झाल्याने आगारातील कर्मचारी वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post