अखेर, वणीजवळ नीरगुडा' गाव सापडले...!

वणी /

सातवाहन आणि वाकाटक ह्या २००० वर्षापूर्वीच्या काळात आजच्या वनी शहराचे प्राचीन मुळ गाव हे निरगुडा नावाचे गाव होते. ह्याच गावावरून नदीला निर्गुडा हे नाव पडले, परंतु पुढे हे आदिवासी गाव विकसित होऊन वनी झाले होते परंतु हे गाव कुठे होते है सापडत नव्हते. २०२५ मध्ये वाणीचा इतिहास लिहिण्यासाठी प्रा सुरेश चोपणे ह्यांनी तालुक्याचे संशोधन कार्य हाती घेतल्यानंतर निरगुडा हे गाव वानिजवळच दक्षिणेला आढळले. अशी माहिती संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली.

प्रा सुरेश चोपणे हे त्यांच्या वणीच्या इतिहासा वरील पुस्तकासाठी मागील वर्षापासून परिसरात सर्वेक्षण आणि संशोधन करीत होते. अलीकडे में महीन्यात त्यांना वणीच्या दक्षिणेला नदीच्या किनारी निर्गुडा हे गाव सापडले. नौर म्हणजे पाणी आणि गुडा म्हणजे गाव. ह्याच नीरगुडा गावावरून नदीला निर्गुडा हे नाव पडले. हे गाव खूप प्राचीन असल्याने इथे सध्या लेखी पुरावे आढळले नाही तसेच आज इथे खळबळा मोहोल्ला (रंगनाथ नगर) वस्ती झाल्यामुळे येथील सर्व पुरावे नष्ट झाले असून केवळ प्राचीन मंदिरे तेवढी शिल्लक राहिली आहे. इथे आजही आदिवासींचे देव, भिवसन, मातामाय, अशी ४ देवळे आढळली असून १००० वर्षा पूर्वीची शिव आणि हनुमानाची देवळे येथे आढळली. निरगुडा नदीच्या पलीकडे पूर्वतीरावर सुद्धा आधीवासिंची २ मंदिरे आणि एक शिव मंदिर आढळले आहे. ह्याचाच अर्थ नदीच्या दोन्ही तीरावर निरगुडा हे गाव वसले होते. लालगुडा ह्या गावात सुद्धा भिवसन आणि मातेचे मंदिर तसेच शिव आणि गणेशाची मंदिरे आढळली. ह्यावरून लालगुडा आणि निरगुडा ही दोन्ही गावे प्राचीन काळात आदिवासींची गावे होती..
निरगुडा गावाच्या आणि नदीच्या पूर्वेला असलेल्या शेतात आढळलेली आदिवासी आणि हिंदू मंदिरे

ह्या ठिकाणी प्रा सुरेश चोपणे ह्यांना आदिवासींच्या देवता आढळल्या. पुढे ह्याच गावात हिंदू लोक राहायला आली आणि त्यांनी मंदिरे बांधली. हीच वस्ती पुढे वाकाटक आणि यादव राज्यांच्या काळात वाढली आणि ती रंगनाथ स्वामी मंदिरा पर्यंत वाढली. आज जिथे वनी आहे तिथे पूर्वी खुरटे जंगल होते ब्रिटीशांनी वणीची आखणी करून शहर वसविले. प्राचीन वणीची वाढ दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढली..

वनी नाव कसे पडले.

वणीचे मूळ गाव हे ह्याच निरगुडा गावात आहे. जेव्हा ह्याच परिसरात हिंदू राज्यांच्या काळात व्यापार केंद्र झाले. तेव्हा येथे कापड आणि किराणा दुकाने मोठ्या प्रमाणात सुरु झाली. तेव्हा सभोवतालीच्या गावातून येथे लोक किराणा सामान घ्यायला येत असे.. किराणा दुकान दारांना वाणी 'असे म्हटल्या जात असे. ह्याच वाणी शब्दावरून ह्या मोठ्या वस्तीला वान्यांची वस्ती असे म्हणत असे. ह्याच वाणी शब्दाचा अपभ्रंश होऊन वनी हे नाव
पडले.. मुस्लीम लोक वन, वून असे संबोधत होते. ब्रिटीश राज्यात इंग्रजांनी मुस्लीम लोकांच्या उच्चारावरून कागदोपत्री वून WUN हे नाव लिहायला सुरवात केली परंतु येथील राहिवास्यांनी वनी हे नाव बदलले नाही. एकूणच सर्व अभ्यासाअंती लक्षात येते की पूर्वीचे निरगुडा हेच वाणीचे मूळ गाव असून नदीला ह्याच गावावरून निर्गुडा नाव पडले.

प्रा सुरेश चोपणे

भूशास्त्र आणि इतिहास अभ्यासक

फोन- ९८२२३६४४७३, इ. मेल sureshchopane@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post