वणी /
वणी शहरातील प्रतिष्ठीत व्यक्तिमत्व , ज्योंतिबा फूले हाईस्कूल मारेगांव चे अध्य्क्ष
तथा निलजई उपक्षेत्राचे भूतपूर्व कॅशिअर श्री. अरविंद प्रभाकरराव बोबडे (वय 64) यांचे दिनांक 25 मे 2025 रोजी रविवारच्या सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांना तातडीने नागपूर येथे रुग्णालयात नेत असताना वाटेतच वरोरा येथे त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने वणी परिसरात शोककळा पसरली आहे.
श्री. बोबडे हे मूळचे नायगाव (बु.) येथील रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते वणीतील भूमि पार्क (लालगुडा) येथे वास्तव्यास होते. आपल्या शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. निलजई कोळसा खाण क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे निष्ठेने सेवा बजावली. त्यानंतर निवृत्तीनंतर ते सामाजिक कार्यात सक्रीय राहिले.
त्यांची पत्नी सौ. संध्याताई अरविंद बोबडे या सध्या महिला जिल्हा अध्यक्षा म्हणून काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
श्री. अरविंद बोबडे यांच्यावर अंतिम संस्कार मंगळवारी, दिनांक 27 मे 2025 रोजी सकाळी 8:00 वाजता वणी येथील मोक्षधाम येथे करण्यात येणार आहे.
आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!💐