वणी :
येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा , राजूर (काॅ ) येथे शैक्षणिक वर्ष १९८८ ते १९९८ या कालावधीतील विद्यार्थी व शिक्षक यांचा गोतावळा तब्बल ३७ वर्षानंतर एकत्र आला.या स्नेहमिलन सोहळ्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.माजी विद्यार्थ्यानी वर्ग घेऊन, गाणी गात आणि मनोगत व्यक्त करत आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली.याप्रसंगी शिक्षक सुद्धा त्यात सहभागी झाले व आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी शाळा व गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विविध क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण करणारे १५ मित्र व ३५ मैत्रिणी या स्नेहमिलनाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाला शिक्षक बाळाभाऊ उपलेंचवार, उपलेंचवार मॅडम, सौ निर्मला रोगे मॅडम, राजेश निरे,शरद इंगळे,चौधरी सर ,गारघाटे सर या सर्व सेवानिवृत्त गुरुजनांचा शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्याकडून शाल, श्रीफळ तथा ग्रामगीता देऊन सन्मान करण्यात आला.
संघदिप भगत,करुणा पाटील, गुणवंत पचारे,नम्रता तोडेकर, सुषमा आवळे,हर्षू दुधे,सरिता जांगळे,अनिता सोनेकर, स्मिता कांबळे,गोकर्णा पुणेकर,तारा पाझारे, मोतीलाल काकडे, प्रभाकर भगत,श्रीनिवास पुडकेलवार, नितीन पुडके,हरिहर निमसटकर, प्रविण बडवाईक, हरेंद्र तेलतुंबडे यांच्यासह इतर मित्रांचा सहभाग होता.
संचलन गुणवंत पचारे, प्रास्ताविक करुणा पाटील व आभार प्रदर्शन संघदिप भगत यांनी केले.
मुख्याध्यापक राजेश निरे यांचे सहकार्य लाभले.