वणी /
शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा देणारे रमेश प्रभाकर बोबडे यांची विस्तार अधिकारी (शिक्षण) म्हणून निवड झाली. रमेश बोबडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींकडून प्राप्त झाला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ते स्काऊट गाईड चळवळीमध्ये अविरत सक्रिय आहेत. यवतमाळ स्काऊट गाईडमध्ये त्यांची कारकीर्द देदीप्यमान आणि सर्वांना प्रेरणा देणारीच आहे. अमेरिका येथे आंतरराष्ट्रीय स्काऊट गाईड जम्बोरीमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट प्रदर्शन केलं. स्काऊट विभागातील एल.टी. हे सर्वोच्च प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यांनी शिक्षणक्षेत्रात लक्ष्य़णीय कामगिरी करत मोलाचं योगदान दिलं. उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
------------------------------
*स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!*💐💐