वणी:
प्रख्यात व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते मंगलबाबू चिंडालिया(75) यांचे सोमवार दिनांक 19 मे रोजी रात्री 8-00 वाजता निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची अतिम यात्रा आज मंगळवार दिनांक 20 मे रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या कल्पना मार्बलमागे असलेल्या छोरीया लेआउटमधील निवासस्थानाहून निघेल. अंतिम संस्कार वणीतील मोक्षधाम येथे होतील.
गेल्या अनेक दशकांपासून ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तथा धार्मिक क्षेत्रातही सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा योगेश, सून, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. एक सत्शील आणि मनमिळावू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे.
*स्टिंग ऑपरेशन न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली*!💐💐