तहसील चौकाला राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी

वणी /

 राजमाता अहिल्यामाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा २०२५ निमित्याने पुन्हा एकदा तहसील चौकाला राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे कारण वणी नगर परिषदेने सन २०१८ साली तहसील चौकाला राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे नाव देण्याचा ठराव केला होता मात्र अजूनही अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी राजमाता अहिल्यामाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समिति वणी, मारेगाव, झरी जामणी च्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद, वणी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, राजमाता अहिल्यामाई होळकर यांचा रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा २०२५ मोठ्या उत्साहात महाराष्ट्र भर नव्हे तर संपूर्ण देशभर साजरा होत आहे. वणी नगरीतील धनगर समाज बांधवांच्या मागणी वरुण तत्कालीन नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभा दि.१३/०७/२०१८ ला घेतलेल्या ठरवानुसार तहसील चौकाला राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे नाव देण्याचे ठरावद्‌द्वारे निश्चित केले होते परंतु त्या ठरावाची अमलबजावणी अजून पर्यन्त झालेली नाही.

तरी राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवा निमित्याने तहसील चौकाला राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे. 
निवेदन देतेवेळी राजमाता अहिल्यामाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव समिति वणी, मारेगाव, झरी जामणी चे 
 अध्यक्ष,डॉ. श्रीकांत भगत , उपाध्यक्ष पांडुरंग पंडिले , सचिव विलास शेरकी , गुरुदेव चिडे ,..इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

*गुरुदेव चिडे यांची चक्क विधानपरिषद सभापती यांच्याकडे मागणी*

 वणीच्या तहसील चौकाला राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी धनगर समाजाचे युवा नेते गुरुदेव चिडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज विधान परिषद सभापती
मा.राम शिंदे साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन वणी येथील तहसील चौकाला नाव देण्यात यावे यासाठी चर्चा करून तहसील चौकाला राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे नाव 
 देण्याची मागणी केली. त्यामुळे लवकरच तहसील चौकाला राजमाता अहिल्यामाई होळकर यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Post a Comment

Previous Post Next Post