वणी /
तालुक्यातील शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना पुन्हा एका शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी शिरपूर पोलिस ठाण्याअंतर्गत कायर येथे घडली.
बंडू विठ्ठल गुरनुले वय अंदाजे ४५ वर्ष यांनी सोमवारी १९ मे रोजी दुपारी अंदाजे ३:०० वाजताच्या सुमारास मौजा कायर येथील राहत्या घरात गळफास लावला या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला आणि पाहता पाहता लोकांनी एकच गर्दी केली या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला . मृतकाचे नावे सामाईक मालकीची मौजा कायर येथील गट क्रमांक ७ क्षेत्र ३.९२ हे. आर व गट क्रमांक ३५७ क्षेत्र ०.२८ हे. आर या वर्णनाची शेतजमीन आहे. मात्र गळफास घेण्याचे कारण समजले नाही.
त्यांच्या पश्चात पत्नी संगीता बंडू गुरनुले वय ४० वर्ष, मुलगा अतुल बंडू गुरनुले वय २० वर्ष, मुलगी सुष्मा बंडू गुरनुले वय २२ वर्ष असा आप्त परिवार आहे.
कुटुंबातील कर्ता पुरुष निघून गेल्याने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले. पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहे.