वणी नगरीचे ग्रामदैवत आणि मंदिरावर अंधार...!, श्री रंगनाथ स्वामी मंदिराच्या नावाने जत्रा सुरू....

वणी - विशाल ठोंबरे 

वणी नगरीचे नगर दैवत असलेले श्री रंगनाथ स्वामी मंदिराच्या नावाने सद्या जत्रा सुरू असून मंदिरावर लाईटींग रोशनाई दिसून येत नसल्याने मंदिरावर अंधार दिसून येत असल्याने जत्रेला येणाऱ्या भाविकांत नाराजीचा सूर उमटत आहेत मात्र याकडे नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे.

    असे म्हणतात की, अखिल भारतात श्री रंगनाथास्वामींचे प्राचीन असे दोनच मंदिर आहेत. त्यापैकी एक श्रीरंगम (तिरुवरंगम, तामिळनाडू) आणि दुसरे वणी येथे आहे. ही अती भव्य शेषशाही मूर्ती असून, वणी नगरीचे नगरदैवत आहे. दरवर्षी या नगर दैवताचे नावाने (श्री रंगनाथ स्वामी) मोठी जत्रा भरते , या दरम्यान मंदिरांवर व परिसरात लाईटींग लावण्यात येते त्यामुळे परिसरात झगमगाट दिसतो मात्र यावर्षी जत्रा भरुन १५ दिवस उलटले तरी मंदिरांवर व परिसरात लाईटींग लावण्यात आली नाही परिणामी मंदिरात अंधार पसरला आहे त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मध्ये नाराजीचा सूर उमटत आहेत तसेच परिसरातील नागरिकांनी लाईटींग लावण्याची मागणी केली आहे. रामनवमी जन्मोत्सवानिमीत्य शहरात मोठ्या प्रमाणावर शोभायात्रा काढली जाते यावेळी शहरातील विविध मार्गांवरून श्री रंगनाथ स्वामी मंदिर चौकात शोभायात्रा दाखल होते. त्यामुळे मंदिर प्रशासन किंवा नगर पालिका प्रशासन लाईटींग लावण्यासाठी पुढाकार घेणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*श्री रंगनाथ स्वामी मंदिराच्या नावाने भरते जत्रा मात्र मंदिराकडे दुर्लक्ष!*

शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री रंगनाथ स्वामी मंदिराच्या नावाने दरवर्षी मार्च महिन्यात येथिल जत्रा मैदानावर जत्रा भरतात. तब्बल एक महिन्याची ही जत्रा असते ही जत्रा नगर पालिकेच्या वतीने भरवली जाते याकरिता जत्रेच्या जागेचा तब्बल १५ लाखांपर्यंत हर्रास होतो मात्र हर्रासातून आलेली रक्कम ही नगर पालिकेच्या तिजोरीत जमा होते. जत्रा श्री रंगनाथ स्वामी मंदिराच्या नावाने आणि फायदा नगर पालिकेचा.! काही वर्षापूर्वी नगर पालिकेच्या वतीने मंदिर व मंदिर परिसर तसेच जत्रेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईटींग, टुबलाईट लावल्या जात होते मात्र काही वर्षांपासून नगर पालिकेचे मंदिराकडे व जत्रेकडे दुर्लक्ष होत आहे आधी ही जत्रा तब्बल दोन महिने भरायची आता तर एक महिना कशी बशी भरतात जणू काही जत्रेरवर अवकळा आली की काय असे वाटू लागले असून याला नगर पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

जत्रेच्या प्रवेशद्वारावररच मांस विक्री!

शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री रंगनाथ स्वामी मंदिराच्या नावाने जत्रा मैदानावर जत्रा भरली आहे दरम्यान जत्रा पाहण्यासाठी आणि श्री रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात मात्र जत्रेच्या प्रवेशद्वारावर मांसविक्रीचे दुकान सुरू आहे परिणामी जत्रेला येणाऱ्या भाविकांत नाराजीचा सूर उमटत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post